प्रतिनिधी , पंढरपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही असल्यामुळे आणि दुसऱ्या लाटेची शक्यता आरोग्य विभागाने दिल्यामुळे कार्तिकी यात्रेवर निर्बंध येणार आता स्पष्ट झालेल आहे. त्यातच आता पंढरपूर मध्ये 25 ते 26 नोव्हेंबर अशी दोन दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशी माहिती सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी आज येथे दिली.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने आषाढी यात्रे प्रमाणेच कार्तिक यात्रा देखील प्रतिकात्मक पध्दतने
साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. सर्व सारख्या आणि दिंड्याना पंढरपुरात बंदी केली आहे. शिवाय 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान पंढरपुरातील जाणारी आणि येणारी एसटीची प्रवाशी वाहतूक देखील बंद ठेवण्यात आली आहे.
आषाढी नंतर कार्तिक वारी भरेल आणि त्यामध्ये विठुरायाचे दर्शन करता येईल असं भाविकांना वाटत होतं. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर दर्शनास सुरू झाले आहे. मात्र आता कार्तिकी वारीच्या काळामध्ये पंढरपूर मध्ये.भाविकांना प्रवेश असणार नाही. हे स्पष्ट झाले आहे. सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. पंढरपूर मध्ये 24 नोव्हेंबर च्या मध्यरात्रीपासून 26 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत संचार बंदीचा प्रस्ताव पोलिस विभागाने पाठविला आहे. कार्तिकी यात्रेसाठी सतराशे अधिकारी-कर्मचारी होमगार्ड यांचा बंदोबस्त पोलिस विभागाने लावलेला आहे.तिहरी पद्धतीचा बंदोबस्त असणार आहे .
कार्तिकी एकादशी साठी आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि कोकण या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. सोलापूर जिल्हा प्रशासनाने आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या प्रशासनास सुध्दा पंढरपूर कडे येणार्या भाविकांना येऊ देऊ नये याबाबत सूचना दिल्या आहेत असेही श्री. झेंडे यांनी सांगितले.
