अनिल साबळे, प्रतिनिधी , औरंगाबाद : पंत प्रधान किसान सन्मान योजने मध्ये चुकीची माहिती देऊन सिल्लोड तालुक्यातील 846 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत निधी घेतला होता. मात्र सदरील बाब ही शासन नियमानुसार चुकीची असल्याचे समोर आल्याने शासनाने जो लाभार्थी आयकर दाता, पती पत्नी शासकीय नोकरदार, एकाच कुटुंबा तील अनेक लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले असल्याने दिलेला निधी वसूल करण्या चे आदेश दिले असून आज पर्यंत 45 लाखा रुपये अपात्र लाभार्थ्यांनी जमा केलेले असून मंगळवार पर्यंत ही रक्कम जमा करता येणार आहे. या संदर्भात नायब तहसीलदार किरण कुलकर्णी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
