जनतेज न्युज

राज्यातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांमधील प्रवाश्यांची कोरोना चाचणी

प्रतिनिधी: महाराष्ट्रात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांमधील प्रवाश्यांची कोरोना चाचणी सुरू केली आहे.टिळक नगर टर्मिनस वर दुपारी दाखल झालेल्या नेत्रावती एक्सप्रेस जी केरळ वरून गोवा मार्गे मुंबईत दाखल झाली आहे त्या सर्व प्रवाश्यांची पालिकेतर्फे कोरोना टेस्ट करण्यात येत आहे.ज्या प्रवाश्यांची इंटिजिन टेस्ट पोजिटिव्ह आली त्यांना पीसीआर टेस्ट ही करावी लागत आहे.या टेस्ट मध्ये पोजिटिव्ह आलेल्या प्रवाश्याना बिकेसी कोव्हिडं सेंटर मध्ये पाठविण्यात येणार आहे.