जनतेज न्युज

शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत उभ्या उसाच्या शेतात आग लागून तीन एकर ऊस जळून खाक.

प्रतिनिधी , धुळे: तालुक्यातील आर्णी शिवारातील निंबा बाबूलाल कोळी या शेतकऱ्याचा तब्बल तीन एकर क्षेत्रामध्ये लावलेला ऊस अक्षरशहा जळून खाक झाला आहे. शेजारच्या शेतामध्ये शेतकऱ्याने पाचट जाळण्यासाठी लावलेली आग शेजारच्या उसाच्या शेतापर्यंत पोहोचल्यामुळे काही क्षणातच उसाच्या शेतात आग झपाट्याने वाढू लागली, आग विझवण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी प्रयत्नदेखील केला. परंतु आगीचे स्वरूप वाढत गेल्यामुळे आग आटोक्यात आणणे शेतकऱ्यांना कठीण झालं होतं त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या आगीमध्ये संपूर्ण तीन एकरातील ऊस शेतकऱ्याच्या डोळ्यांदेखत जळून खाक झाला आहे. कृषी विभागाने या घटनेचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यास शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.