प्रतिनिधी , मुंबई : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कृषी विधेयकवरून शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करणाऱ्या केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. देशातील फक्त पंजाब आणि हरियाणा नाही तर देशभरातील सर्व शेतकऱ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारनं सहानुभूतिपूर्वक विचार करावा. आज देशातील राज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, कृषी कायद्यांचा एक विषय आहे, इतरही मागण्या आहेत, त्याचा केंद्र सरकारनं विचार करण्याची गरज आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
