प्रतिनिधी , नवी मुंबई : केंद्र सरकारने मागील दोन-तीन महिन्यांपूर्वी शेतकरी विरोधक विधेयक पास केले यामध्ये शेतकऱ्यांच कंबरड कस मोडेल व शेतकरी कसा नेस्तनाबूत होईल हे भाजप सरकारने पहिले आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केला जात आहे शेतकरी विधेयकाविरोधात पंजाब हरियाणा मधील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला घेराव घातला असून आज त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे यामध्ये पंजाब हरियाणा मधील शेतकरी गुरमीत सिंह शहीद झाले असून एका शेतकऱ्याचा डोळा निकामी झाला आहे याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध व्यक्त करण्यात आला खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम शरद पवार यांनीच केले आहे तसेच महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याचा दावा यावेळी करण्यात आला भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या विरोधात असून भांडवलदारांचे सरकार असल्याचाही दावा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे तसेच अदानी अंबानी दिवसागणिक श्रीमंत होत आहेत मात्र शेतकरी कामगार वर्गाची स्थिती मात्र दिवसागणिक खालावत आहे।
