प्रतिनिधी , बारामती : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील वैदू समाजातील एका अल्पवयीन मुलीच्या लग्नाची जय्यत तयारी चालू होती मात्र पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांना या लग्नाची माहिती मिळताच त्यांनी हा विवाह थांबून मुला-मुलींच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे..
30 नोव्हेंबर रोजी डोर्लेवाडी येथील वैद्य वस्ती मध्ये एका अल्पवयीन मुलीचे लग्न होणार होते या लग्नातील नवरदेव हा केडगाव येथून वर उपस्थित झाला होता मात्र त्याअगोदर बारामती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नामदेव शिंदे यांना तहसीलदार यांच्याकडून मुलीचे फोटो आणि विवाह बद्दल माहिती मिळाली होती.. त्यानुसार आज आम्ही हा अल्पवयीन विवाह रोखून या समाजाचे प्रबोधन करत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे..
