प्रतिनिधी , कोलापूर : मराठा समाजाला अजून आरक्षण मिळाल नाहीय तरीही महावितरण मध्ये सुरू असणारी भरती त्वरित थांबवावी त्याचबरोबर वीज बिल माफ करावीत या मागणीसाठी आज मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर मध्ये आंदोलन केलं महावितरण कार्यालयाच्या बाहेर घोषणाबाजी केल्यानंतर निवेदन देण्यासाठी अधिकार्यांची भेट घ्यायला आंदोलक कार्यालयात गेले त्यावेळी अधिकाऱ्यांसोबत आंदोलनकर्त्यांची जोरदार बाचाबाची झाली पण याच वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असल्याने अनुचित घटना घडली नाही पण मराठा समाजातील कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी ऊर्जामंत्री यांच्या कार्यालयाशी संपर्क केला त्यानंतर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कार्यालयातून ही भरती थांबवली गेल्याचं फोनवरून सांगण्यात आल त्यानंतर मराठा समाजाचे कार्यकर्ते शांत झाले पण या आंदोलनामुळे महावितरण मधली भरती थांबल्याने मराठा समाजातील हजारो युवकांना दिलासा मिळाला आहे
