प्रतिनिधी , भंडारा : भंडारा शहरातील लक्ष्मी उद्योग येथील पितळ कामगाराने कामगारांनी मालकांने केलेल्या अन्यायाच्या विरोधात आज दि.2 नोव्हेंबर पासून भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे
भंडारा शहरातील नामवंत लक्ष्मी उदयोग भंडारा येथे नरेश कनोजे, प्रकाश रामटेके, शांताबाई आंबागडे हे कामगार गेल्या 25 वर्षांपासून काम करीत होते. मालक श्री. दिनेश गर्ग यांनी अचानक कारखाना बंद केला. मात्र ग्रज्युईटी, बोनस व ईतर रक्कम कामगारांना दिली नाही म्हणून दि. 03/8/2020 रोजी सहायक कामगार कार्यालय भंडारा येथे तक्रार दाखल केली होती. कामगार कार्यालयात सात तारखा झाल्या मात्र एकाही तारखेला मालक व मॅनेजर हजर झाले नाही.
