जनतेज न्युज

पुणे पदवीधर महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांचा विजय

प्रतिनिधी , पुणे : पुणे पदवीधर महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांचा विजय झाल्याने सातारा राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.. 12 डिसेंबर रोजी शरद पवारांच्या वाढदिवसानिम्मित सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा उमेदवार विजयी करून भेट देण्याचे काम महाविकास आघाडीने केलं असल्याचं यावेळी सांगण्यात आले. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.