जनतेज न्युज

तिघे अट्टल चोरटे गजाआड नंबर प्लेटला पिवळा रंग फासलेल्या रिक्षातून फिरत करायचे चोरी

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कल्याण परिसरात नंबर प्लेटवर पिवळा रंग फासलेली रिक्षा फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या रिक्षाचा माग काढत रिक्षा अडवली .रिक्षातील तिघांसह एका अल्पवयीन मुलाची
पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला .पोलिस चौकशी दरम्यान रिक्षा मधील चौघे अट्टल चोरटे असल्याचे निष्पन्न झाले . कबुली पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक करुन पुढील सुरु केला आहे
कल्याण पश्चिमेतील झुंजारराव मार्केट मधील एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानातुन रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी लाखोंच्या वायरी चोरी केल्याची घटना घडली होती .या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.याच दरम्यान महात्मा फुले पोलिसांना नंबर प्लेट वर पिवळा रंग फासलेली रिक्षा संशयास्पद रीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली .पोलिसांनी त्या रिक्षा चालकाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.त्याची चौकशी केली असता रिक्षा चालकासह रिक्षात प्रवासी म्हणून बसणारे चौघे चोर असल्याचे समोर आले रात्रीच्या वेळी ते चोरीचं काम करत होते. बायी यादव, विनय विश्वकर्मा, अभिजीत बहिरे आणि एक अल्पवयीन तरुणालाही ताब्यात घेतलं आहे अल्पवयीन चोरट्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. दरम्यान या आरोपींकडून दोन गुन्ह्याची उकल झाली असून तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे .