युवाशक्तीचे रास्ता रोको आंदोलन
प्रतिनिधी , तेहलेरा : वान चे पाणी तेल्हारा तालुक्यातील नागरिकांना पिण्यासाठी व सिंचनासाठी आरक्षित करावे खरीप हंगामाची आणेवारी ठरवून शेतकऱ्यांना दुष्काळ मदत निधी, पीक विम्याचा लाभ घ्यावा तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिवसा वीज पुरवठा करावा, रस्त्याची दुरुस्ती करावी यासह विविध मागण्यांसाठी आज टावर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान पर्यंत भव्य मोर्चा काढून जोरदार नारेबाजी देऊन युवाशक्ती संघटनेच्या वतीने तेल्हारा येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अकोला उपजिल्हाधिकारी यांनी भेट देऊन निवेदन स्वीकारले सात दिवसाच्या आत सर्व मागण्या मार्गी न लागल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा युवाशक्ती संघटनेने दिला आहे यावेळी तेल्हारा हिवरखेड पोलीस स्टेशनचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता
