जनतेज न्युज

पणन विभागाच्या अंतर्गत केंद्राच्या कृषी विधेयकातील येणाऱ्या मुद्द्यांना स्थागिती दिल्याची माहिती

प्रतिनिधी , पणन विभागाच्या अंतर्गत केंद्राच्या कृषी विधेयकातील येणाऱ्या मुद्द्यांना स्थागिती दिल्याची माहिती सहकाराने आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे… ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते…या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत आंदोलन सुरू आहे…त्यातून निश्चित मार्ग निघेल…त्याच बरोबर सहकारी संस्थांच्या लांबलेल्या निवडणुका 31 डिसेंबर नंतर 6 महिन्याच्या आत घेतल्या जातील अशी माहिती देखील बाळासाहेब पाटील यांनी दिली… अडचणीत असलेल्या राज्यातील 32 कारखान्यांना कर्जाची हमी सरकारने दिली आहे….हे कारखाने बंद होऊ नयेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाचे नुकसान होऊ नये यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहेत अशी माहिती देखील मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिलीय…