जनतेज न्युज

कल्याणच्या खाडीमध्ये अडकलेल्या 2 चिमुकल्यांचा स्थानिकांनी वाचवला जीव; दोन वर्षांच्या मुलासह सहा महिन्यांचा बाळाचा समावेश

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कल्याण-ठाकुर्ली रोडवर कचोरे खाडीमध्ये अडकलेल्या 2 चिमुरड्यांचा स्थानिक नागरिकांनी जीव वाचवला. यामध्ये एका सहा महिन्यांच्या तान्ह्या बाळाचाही समावेश आहे. तर या दोघांना इकडे कोण सोडून गेले? आणि का सोडून गेले ? हे प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत. दरम्यान याप्रकरणी स्थानिकांनी पोलिसांनाही माहिती देण्यात आली असून या दोन्ही मुलांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे .दरम्यान या घटनेमुळे कचोरे गावातील स्थानिक मात्र हादरून गेले.
व्हीओ : आज दुपारी 2 ते अडीच वाजण्याच्या सुमारास कचोरे गावातील स्थानिकांना खाडीतील बेटावर दोन लहान मुलं दिसली आणि त्यांना एकच धक्का बसला. त्यातील एक जण साधारणपणे 2-3 वर्षांचा तर दुसरा तर अक्षरशः सहा महिन्यांचे तान्हे बाळ होते. गंभीर बाब म्हणजे खाडीला भरती सुरू झाली होती आणि हे दोन्ही चिमुकले असणारे ठिकाण आणि खाडीच्या पाणीमध्ये अवघ्या काही इंचाचाच फरक राहिला होता. कचोरे गावातील स्थानिक रहिवासी गणेश मुकादम, अमित मुकादम आणि तेजस मुकादम यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी धाव घेत या दोघांनाही सुखरूपपणे खाडीच्या बाहेर काढले. या मुलांना बाहेर काढण्यात थोडासा जरी विलंब झाला असता तर या चिमुकल्यांच्या जीवावर बेतले असते.