जनतेज न्युज

धुळे शहरात राबवण्यात आले माझी वसुंधरा अभियान.

प्रतिनिधी , धुळे : वसुंधरा अभियानाअंतर्गत नागरिकांत स्वच्छतेबाबत जनजागृती होण्याच्या दृष्टीने धुळे शहरातून जनजागृती करत सायकल रॅली काढण्यात आली. देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र शासनाकडून संपूर्ण देशामध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. तसेच याचाच एक भाग म्हणून संपूर्ण राज्यात जल, वायू, आकाश, अग्नी, पृथ्वी या पंचतत्वावर आधारीत माझी वसुंधरा अभियान सुरू झाले आहे.
त्याच पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व स्वतःचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी धुळे महानगरपालिका आयुक्त अजीज शेख, महापौर चंद्रकांत सोनार, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी आपल्या घरापासून सायकल रॅली काढून वसुंधरा अभियानाला सुरवात केली. यावेळी सांगितले की, दर मंगळवारी प्रत्येक नागरिकांनी व मनपाच्या अधिकारी कर्मचारी सगळ्यांनी गाड्यांचा वापर टाळून सायकल वापरावी जेणेकरून पर्यावरणाचा तोल सांभाळत येईल असे आवाहन यावेळी करण्यात आले.