जनतेज न्युज

अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर महिला मजूर घेऊन जाणारी तवेरा चारचाकी वाहन पेटली – सतर्कतेमुळे जीवितहानी टाळली..

प्रतिनिधि , अमरावती नागपूर : अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा पोलिस स्टेशनच्या हद्दीत शेंदोळा खुर्द जवळ कंपनीमधून काम करून 14 महिला मजूर चारचाकी वाहनाने घरी जात असतांंना अचानक चारचाकी वाहणाने पेट घेतला मात्र चालकाच्या लक्षात येताच सर्व महिला मजुरांना खाली उतरून महिला मजुरांचा जीव वाचवला मात्र यात गाडी पूर्ण जळून खाक झाली.
नांदगाव पेठ एमआयडीसि येथील कंपनीत तिवसा येथील महिला रोज काम करण्यास जातात यात काम करून सर्व महिला चारचाकीने आपल्या घरी जात असताना अचानक चारचाकीने पेट घेतला,या चारचाकी मधून धूर निघताच चालकाने तात्काळ सर्व महिलांना खाली उतरवले त्यामुळे या घटनेत कोणालाही इजा पोहोचली नाही,या घटनेची माहिती तिवसा पोलीसांना मिळताच तिवसा नगरपंचायतच्या अग्निशमन वाहनाला पाचारण करण्यात आले काही वेळातच घटनास्थळी वाहन पोहचले व आगीवर नियंत्रण आणण्यात पोलीस व अग्निशमन वाहनाच्या कर्मचाऱ्यांना यश आले
मात्र तो पर्यंत गाडी मोठ्या प्रमाणावर जळाली होती वाहनाने पेट घेतल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक वेळ ठप्प झाली होती आगीवर नियंत्रण मिळवताच सर्वांनी सुटकेचा स्वास घेतला.