प्रतिनिधी , सांगली : सांगलीतील स्टेशनचा गीते येथे गेल्या सोळा दिवसापासून केंद्राने मंजूर केलेली कृषी विधेयके रद्द करा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठींबा म्हणून सांगलीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दिलेला आहे.तसेच केंद्र सरकारच्या निषेधार्थ आज सांगलीतील स्टेशन चौक परिसरात धरणे आंदोलन करून रिलायन्स जियो कार्डाची होळी करण्यात आली. सांगलीत किसान संगर्ष समितीच्या वतीने गेल्या दहा दिवसापासून दिल्ली आंदोलनाला पाठींबा म्हणून किसान बाग आंदोलन सुरू आहे दररोज रात्री सात ते नऊ या वेळेत वसंतदादा पुतळ्याजवळ हे आंदोलन सुरू आहे आंदोलनाला पाठींबा म्हणून 8 डिसेंबर रोजी सांगली बंद करण्यात आली होती अद्यापही सकारात्मक निर्णय झाला नाही त्यामुळेच आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी देशव्यापी पुन्हा आंदोलनाचा जोर वाढविण्याचा व रिलायन्स व अदानीच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याच आंदोलनाचा भाग म्हणून येथील स्टेशन चौकात दिवसभर धरणे आंदोलन तसेच जियो कार्डाची होळी करण्यात आली.यावेळी विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
