जनतेज न्युज

नगरसेविका पतीने महापालिका कर्मचारी असलेले शहर अभियंता वसीम पठाण यांना केलेल्या मारहाणीचा निषेध.

प्रतिनिधी , परभणी : नगरसेविका पतीने महापालिका कर्मचारी असलेले शहर अभियंता वसीम पठाण यांना केलेल्या मारहाणीचा निषेध म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केलाय.
शुक्रवारी महापालिका शहर अभियंता पठाण यांना नगरसेविका फतेमा बेगम यांचे पती अबदुल जावेद यांनी मारहाण केली होती. दरम्यान पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहे, मात्र आरोपीला अटक करण्याच्या मागणीवर महापालिका कर्मचारी ठाम आहेत .