प्रतिनिधी, चोपडा : चोपडा तालुक्यातील एप्रिल ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपणाऱ्या 52 ग्रामपंचायतींचे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले असून त्याकामासाठी 28 निवडणूक निर्णय अधिकारी व 28 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारींची नेमणूक करण्यात आली असल्याचे तहसीलदार छगन वाघ यांनी सांगितले.
