जनतेज न्युज

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचे शालेय शैक्षणिक माफ करावी यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.

प्रतिनिधी , कोलापूर : कोरोना महामारी काळात अनेक महिने बंद असलेल्या शाळा काही महिन्यापासून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे तर हे ऑनलाईन शिक्षण देणारे शिक्षक मुलांकडून संपूर्ण वर्षभराची फी मागत आहेत व ती फी न भरल्यास whatsaapp ग्रुप मधून बाहेर काढण्याचे प्रकार सुरू आहेत या मुळे मुलाचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने आज विद्यार्थी संघटनेचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते
कोल्हापूर – ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा आरक्षण निवडणूक निकालानंतर काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात मुदत संपलेल्या 14 हजार ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक इच्छुकांचा यामुळे भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे राज्य सरपंच परिषदेने आता या निर्णयाला विरोध सुरू केला असून प्रसंगी न्यायालयात धाव घेण्याची तयारी परिषदेकडून सुरू झाली आहे.