जनतेज न्युज

आयकीया कंपनीने स्थानिकांना प्राधान्य न देता इतरांना घेतल्याने भाजप आक्रमक.

प्रतिनिधी , कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात युवक,पुरुष,महिला ह्या बेरोजगार झाल्या आहेत.त्यातच नवी मुंबई तील तुर्भे स्टोअर याठिकाणी परदेशी आयकीय कंपनीच्या नवीन मॉलला 18 डिसेंबर पासून सुरवात होणार आहे.ह्या आयकीया कंपनीने आपल्या कम्पनित स्थानिकना प्राधान्य न देता दिल्ली,गुडगाव,मुंबई, पुणे या शहरातील लोकांना नोकरी वर ठेवण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी भाजपा नेत्यांनी केला आहे. व आज त्याच धर्तीवर स्थानील नागरिक व प्रकल्पग्रस्थावर झालेल्या अन्याय विरोधात आइकिया कंपनीचा जाहीर निषेध हा करण्यात आला.
झोपडपट्टी भागातही नागरिक हे कमी शिकलेले अथवा शिकलेले नसतात त्यामुळे ही कंपनी आम्हाला घेत नसल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे.

यावेळी आयकिया कंपनीशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही