प्रतिनिधी , ऐरोली सेक्टर ९ मधील राधाकृष्ण सोसायटी मध्ये सिक्यूरिटीचे काम करणार्या राजेश सिंग यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. अडीच वर्षांची निकीता सिंग ही सोसायटी मध्ये खेळत असताना जिन्याच्या खाली असलेल्या टाकीत जावून पडली होती. टाकीचे झाकण उघडे असल्याने ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. ११ तारखेला निकीता अचानक गायब झाल्यानंतर तिचा शोध घेण्यात आला होता. निकिताचा थांगपत्ता लागत नसल्याने रबाले पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. अखेर पाच दिवसानंतर टाकीच्या पाण्याचा वास यायला लागल्यानंतर टाकी चेक केली असता त्यात अडीच वर्षाच्या निकीताचा मृत्यदेह मिळाला. याप्रकरणी रबाले पोलिसांनी सीसीटीव्ही ताब्यात घेवून अधिक तपास सुरू केला आहे.
