.प्रतिनिधी , कोलापूर : पालिकेनं आज एक अजब फतवा काढलाय…ज्या कोल्हापूरकरांनी घरफाळा भरला नाही त्यांना जन्म-मृत्यू दाखले मिळणार नसल्याचं घोषित केलंय…घरफाळा वसूल करण्यास कुणाचा विरोध नाही पण अशा पद्धतीचा आदेश काढल्यानं शहरात नाराजीचा सूर पाहायला मिळतोय….
कोल्हापूर महापालिका आज एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आलीय… त्याच झालं असं की घरफाळा वसूल करण्यासाठी पालिकेनं एक आदेश काढला… यात काय म्हटलं तर तुमचा घरफाळा थकीत असेल तर तुम्हा जन्म-मृत्यू सह अन्य दाखले मिळणार नाहीत…थकबाकी वसूल करण्यास कोल्हापूरकरांचा विरोध नाही…मात्र असा जाचक आदेश काढणं चुकीचं असल्याचं बोलून दाखवलंय… त्यामुळंच आज कोल्हापूर कृती समितीच्या वतीनं पालिकेच्या कार्य़ालयाबाहेर या आदेशाची होळी करुन निषेध केला…आणि संबंधित आदेश मागे घेण्याची मागणी केली…
