प्रतिनिधी , वाशिम : केंद्र सरकारने नव्याने पास केलेले तीन कृषी विधेयक रद्द करण्यासाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा तसेच मोदी सरकारने भारतीय रेल्वेच्या खाजगीकरणाचा घातलेला घाट याला विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी असंख्य कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले असून,केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणा देत निषेध करण्यात आला…
