जनतेज न्युज

कृषी विधेयक च्या विरोधामध्ये धुळ्यात वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र आंदोलन.

प्रतिनिधी , धुळे : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयक च्या विरोधामध्ये दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारच्या विरोधामध्ये निषेध नोंदविण्यासाठी धुळ्यात वंचित बहुजन आघाडी तर्फे आंदोलन करण्यात आले.
धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ असलेल्या क्युमाइं क्‍लब येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार विरोधामध्ये मोठ्याप्रमाणात घोषणाबाजी करीत मोदी सरकार हे आदानी व अंबानी यांचे गुलाम असून अदानी व अंबानी यांचं हीच जोपासण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी देण्याचं कट-कारस्थान मोदी सरकारकडून केले जात असल्याचा घणाघाती आरोप देखील यावेळी आंदोलकांतर्फे करण्यात आला आहे.
राज चव्हाण ( वंचित आघाडी जिल्हा प्रवक्त)