प्रतिनिधी , मुंबई : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेवर गुरुवार म्हणजेच आजपासून वातानुकुलित लोकल सुरू झाली आहे कुर्ला ते सीएसटी अशी पहिली फेरी पहाटे 5.40 मिनिटांनी निघाली असून एकूण १० गाड्या चालविण्यात येणार आहेत. दरम्यान या मार्गावर केवळ अधिकृत परवानगी असलेल्यांनाच प्रवासाची परवानगी असणार आहे. मध्य रेल्वेने वातानुकुलित लोकलचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. कुर्ला ते सीएसएमटी, सीएसएमटी ते डोंबिवली, डोंबिवली ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते कल्याण या एसी लोकल धावणार आहेत.
मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गावर सध्याच्या सेवेऐवजी उद्यापासून १० वातानुकुलीत लोकल गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ते शनिवार या दिवशीच या लोकल धावणार आहे.
