प्रतिनिधी , मुंबई : आरेचं जंगल वाचवणं यात कुठला अहंकार हे तर राष्ट्रीय कर्तव्य, हा तर केंद्र सरकारचाच कार्यक्रम, वाघ वाचवा, नदी वाचवा, जंगल वाचवा, हा मोदी सरकारचा कार्यक्रम, ही लढाई सुरुच राहील, महाष्ट्रातील सरकार आलं नाही याचं राजकीय दु:ख मी समजू शकतो, पण अशा प्रकारे केंद्राच्या अख्त्यारीतल्या यंत्रणा हाताशी धरुन महाराष्ट्राला त्रास देणं, जनतेचा छळ करणं हे फार काळ चालणार नाही.
प्रकाश आंबेडकरांचं एक विधान फार महत्त्वाचं आहे, त्याबाबत त्यांचं अभिनंदन, कांजुरमार्ग मेट्रो कारशेडला विरोधी पक्षाने राजकीय विषय केलाय, त्यात न्यायालयाने पडू नये, जमीन महाराष्ट्राची आहे, हे सरकार महाराष्ट्राचं आहे, आता मीठागरवाले आलेत कुठून, न्यायालय यात कशासाठी पडतंय असा प्रश्न उपस्थित होत आहे. असे वक्तव्य संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.
कांजुरच्या जागी कोणी राजकारणी बंगले, फार्महाऊस बांधणार नाहीत, हा मुंबई, महाराष्ट्र आमि पर्यायाने देशाच्या विकासाचा विषय आहे, त्यावर अशा प्रकारे निर्णय येणे चुकीचं, याच जमिनीवर पूर्वीचं सरकार पोलीस आणि दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्प राबवणार होतं, म्हणजे जमिन सरकारचीच आहे ना,
