प्रतिनिधी , सोलापूर : नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरु असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.
जोपर्यंत नवीन कृषी कायदा रद्द होणार नाही तोपर्यंय वंचित बहुजन आघाडी मागे हटणार नाही असं प्रतिपादन वंचित कडून करण्यात आलं आहे.
या धरणे आंदोलनामध्ये सोलापूरला शहर तसेच जिल्हा आणि माढा विभागातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते,
यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली…
