मिरजेत ड्रेनेज पाईपलाईन खुदाई काम करताना मशीनचा फणा विद्युत तारेला लागल्याने अनेक घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून लाखोंचे नुकसान,नुकसान भरपाई मिळत नाही तो पर्यंत काम सुरू होऊ देणार नाही नागरिकांनी दिला इशारा.
प्रतिनिधी , सांगली : मिरज ओढ्या लगत असलेल्या किणीकर मळा परिसरातील 30 ते 35 घरामध्ये शॉर्ट सर्किट होऊन विद्युत उपकरणे जळून खाक पडली आहेत त्यामध्ये टीव्ही ,फ्रीज,होम थेटर,मोबाईल अश्या विद्युत उपकरणाचा समोवेश आहे. याठिकाणी रस्त्यावर शहरातील मुख्य ड्रेनेज पाईपलाईन कामाचे खुदाई काम सुरू आहे , काल रात्री उशिरा काम करत असताना पोकल्यानं मशीनचा फणा विजेच्या तारेला लागल्याने परिसरातील घरात शॉर्ट सर्किट होऊन विद्युत उपकरणे जाळून खाक झाली आहेत यामध्ये घरातील टीव्ही फ्रीज होम थेटर, मोबाईल आधी वस्तूंचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. जो पर्यंत नुकसान भरपाई देत नाहीत तो पर्यंत ठेकेदाराला पाईपलाईन खुदाई काम सुरू करू देणार नाही असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. सध्या याठिकाणी रस्ता खुदाई झाल्याने मिरज बेडग ,कर्नाटक मार्ग बंद आहे पर्यायी रस्ता न केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
