प्रतिनिधी , बुलडाणा : सोशल मीडियावर राजपुत समाजाची बदनामी होईल अशा अशयाची पोस्ट आंचरवाडी एक गाव या वॉट्सएप्प गृपमध्ये टाकल्यामुळे राजपुत समाजाची बदनामी होऊन भावना दुखावल्या आहेत.त्यामूळे समाजातील युवक व समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यासंबंधात आज बुलडाणा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे .आक्षेपार्ह लिखान करणाऱ्या अरुण गवई याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.तसेच संबंधित व्यक्तीवर कारवाई न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी करणी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी करणे सेनेचे तसेच राजपूत समाजाचे उपस्थित होते.
