प्रतिनिधी,नागपूर : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नागपुर विभाग तर्फे 18 /12/2020 रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाने गोवारी हे आदिवासी नाहीत असा ऐतिहासिक निर्णय दिला त्या निमित्त आनंद उत्सव साजरा करण्यात आला व या साठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मेहनत घेणारे मान्यवर यांचे अभिनंदन सुद्धा करण्यात आले सोमवारी गोंड राजे बक्त बुलंद शाह पुतला, सिविल लाईन, नागपुर येथे हा जल्लोष करण्यात आला
