जनतेज न्युज

बेस्टच खाजगीकरण नाही, विरोधकांचा आरोप निराधार – महापौर किशोरी पेडणेकर

प्रतिनिधी , मुंबई : आर्थिक संकटांमध्ये सापडलेल्या बेस्टचे खाजगीकरण होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. ही चर्चा मध्ये काहीही तक्ते नसल्याची माहिती मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. बेस्टच खाजगीकरण नाही विरोधकांचा आरोप निराधार आहे. अशी माहिती महापौर किशोर पेडणेकर यांनी एका रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यांमध्ये रक्ताचा तुटवडा असल्यामुळे लोकांनी रक्तदान करावे असे आव्हान केले होते. त्यानंतर शिवसह्याद्री कडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले अनेक लोक रक्तदान करता हे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला लोकांचा चांगला प्रतिसाद असल्याचे देखील महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.