जनतेज न्युज

यापुढील सर्व स्थायी समितीच्य व वैधानिक सभा होणार प्रत्यक्ष स्वरुपात.

प्रतिनिधी , ठाणे : ठाण महापालिकेच्या स्थायी समिती व वैधानिक समितीच्या सभा व बैठका प्रत्यक्ष घेण्याचे निर्देश सोमवारी राज्य शासनाने दिले आहेत. तसेच, उच्च न्यायालयानेही तसे आदेश दिले आहेत. तेव्हा महापालिकेची सर्वसाधारण सभा देखील प्रत्यक्ष घेण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केली आहे. ठाणो मनपा प्रशासनानेही याबाबत अनुकुल व्हावे. अन्यथा प्रत्यक्ष महासभेसाठी पुन्हा एकदा उच्च न्यायालयाचे दार ठोठवावे लागेल. असा इशाराही जगदाळे यांनी दिला आहे. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, गटनेते नजीब मुल्ला, नगरसेवक शाणु पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. स्थायी समितीच्या सभा प्रत्यक्ष व्हावी यासाठी आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार सभापती निवडीची सभा वगळता पुन्हा स्थायी समितीच्या सभा ही वेबीनारद्वारेच घेण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा या संदर्भात उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. त्यावेळेस राज्य शासनाने एक आठवडय़ाचा अवधी मागितला होता. परंतु एका दिवसात आपले म्हणने सादर करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य शासनाने दिले होते. त्यानंतर आता उच्च न्यायालयाने देखील स्थायी समितीची सभा प्रत्यक्ष स्वरुपात घ्यावी असे आदेश दिले होते. तर दुसरीकडे राज्य शासनाने देखील एक परिपत्रक काढले असून त्यानुसार यापुढील स्थायी समितच्या प्रत्येक बैठका व वैज्ञानिक बैठका या प्रत्यक्ष स्वरुपात सोशल डिस्टेसींगचे पालन करुन आणि नियमानुसार घेण्यात याव्यात असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता प्रशासनाने त्याची अंमलबजावणी करावी आणि त्यानुसार पुढील कार्यवाही करावी अशी मागणी जगदाळे यांनी यावेळी केली.दरम्यान जुलै महिन्यात या संदर्भात पत्रक काढले असतांनाही महापालिका प्रशासनाकडून वेळेवर व नियमित सभा घेतल्या गेलेल्या नाहीत, त्यामुळे आधीच मंजुर झालेले विषय नंतर महासभा किंवा स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आणले जात असल्याचेही यावेळी जगदाळे यांनी निदर्शनास आणले. त्यामुळे यापुढे तसा प्रकार होऊ नये यासाठीच न्यायालयात धाव घेतल्याने आता राज्य शासनाने देखील तसे पत्रक काढल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.