जनतेज न्युज

महाराष्ट्रात गुंतवणूक येते याचे आम्हाला आनंद आहे मात्र यातील अनेक प्रोजेक्ट आमच्या काळात आले आहे..

प्रतिनिधी , नागपूर : विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेला आमच्या काळात पहिल्या नंबर ची गुंतवणूक महाराष्ट्रात होती .. अस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं।.. चीन मधील गुंतवणूक आता भारतात येत आहे ती महाराष्टात यायला पाहिजे मात्र विदेशी गुंतवणुकीत गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे , कर्नाटक दुसऱ्या आणि महाराष्ट तिसऱ्या क्रमांकावर आहे . आधी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होती . महाराष्ट्र पहिला होता आता तिसऱ्या क्रमांकवर आहे …मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लावत “मुख्यमंत्री आशावादी आहे याचा आनंद आहे त्यांना 50 वर्ष मुख्यमंत्री राहण्यासाठी शुभेच्छा” . स्वप्न सगळ्यांनीच पहाचे असतात असंही त्यांनी सांगितलं ..तर जैतापूर विषयावर बोलताना जैतापूर मध्ये मोबदला मिळाल्याने प्रकल्प होऊ शकतो असे शिवसेने कडून सांगितलं गेलं त्यांची भूमिका बदलते याचा आनंद आहे मात्र मोबदला कोणाला मिळाला हे पाहावे लागेल अस म्हणत जैतापूर प्रमाणे नानार संदर्भात सुद्धा शिवसेने ने अशीच भूमिका घ्यावी तिथल्या लोकांनी सुद्धा जमीन दिली त्यामुळे प्रकल्प मार्गी लागतील असाही वक्तव्य फडणवीस यांनी केलं..