प्रतिनिधी , मुंबई : कॉंग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा कार्यभार आज भाई जगताप यांनी स्वीकारला.यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांच्या पत्नीला आलेल्या ईडी नोटीसीवर आपली प्रतिक्रिया दिली.ईडीने पाठवलेल्या नोटीसीबाबत मला जास्त काही माहीत नाही.मात्र,एवढं सांगू शकतो की ईडी करत असलेली चौकशी चुकीची आहे.पंतप्रधानांनी ईडीच्या या प्रक्रियेवर लक्ष द्यावं, ईडी ही संस्था सूड उगरण्यासाठी नसल्याचं मत भाई जगताप यांनी व्यक्त केलं आहे.
