प्रतिनिधी , नंदुरबार : ग्रामपंचायत बिनविरोध व्हाव्यात याला आमचे समर्थन आहे. परंतु कोणीही ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी पैशाचा लोभ देऊ नये, असे मत माजी मंत्री व कांग्रेसचे जेष्ठ नेते पद्माकर वळवी यांनी मांडले आहे. भाजपाचे शहादा तलोदाचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले होते की, ज्या ग्रामपंचायत बिनवीरोध होतील त्यांना १० लाखाचा निधी दिला जाईल.
तसेच सरपंच पदासाठी लागलेल्या ४२ लाखाच्या बोलीवर पद्माकर वळवी यांनी प्रतिक्रिया दिली. ग्रामपंचायतीमध्ये पैनल बनवून निवडणूक लढवली जाते आणि पैनल प्रमुख हा निवडल्यावर सरपंच बनू शकतो आणि ग्रामपंचायतीमध्ये एवढे अधिकार आहेत की स्वतः वर्षभरात करोड़ोचे कामे करू शकतात. म्हणून कोणी पैशाचा लोभ ग्रामपंचायतींना देऊ नये. तसेच काँग्रेस पक्ष जिल्ह्यात मजबूत असून काँग्रेसला कोणी कमजोर समजू नये असे मत माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी मांडले आहे.
