प्रतिनिधी , जालना- जालना जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 450 हुन अधिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. आज उमेदवारांच्या अर्जांची छानणी सुरू असताना, जालना जिल्ह्यातील माळशेंद्रा गावाच्या विरोधी गटाचे सर्वच अर्ज बाद झाल्याने वंचीत बहुजन आघाडीच्या पॅनलच्या सर्वच उमेदवारांचा विजय निश्चित झाला आहे. जालन्यातील माळशेंद्रा ग्रामपंचायत ही राज्यातील वंचीत बहुजन आघाडीच वर्चस्व असणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
