जनतेज न्युज

बुलडाण्यात नविन वर्षाचे स्वागत व्यसनमुक्त पद्धतीने, ‘दारु नाही तर दुध प्या’ शिवसंग्राम संघटनेचा उपक्रम

प्रतिनिधी , बुलडाणा- इंग्रजी नववर्षाचे स्वागत करताना दारू ऐवजी दूध प्या असे जर कोणी म्हटले, तर सर्वजण त्याला वेड्यात काढतील. परंतु बुलडाण्यातील शिवसंग्रामचे संदिप गायकवाड गेल्या सात वर्षापासून ‘दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत करा’ असा कृतीतून संदेश देत आहेत.
३१ डिसेंबर म्हटले, की दारू पिऊन सेलिब्रेशन करण्याकडे युवा वर्गाचा कल असतो. त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर हुल्लडबाजी, दारू पिऊन वाहन चालविणे, सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून मोठा आवाज करणे यासारख्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे शांतता व सुव्यवस्था भंग पावते, तसेच दारूमुळे अपघात होतात. काही लोक मृत्युमुखी पडतात, तर काहीजण जखमी होतात. परिणामी त्यांच्या कुटुंबाचा आधार गेल्याने संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येते. अशा घटना घडू नयेत यासाठी शिवसंग्राम परिवाराने व्यसन मुक्तीसाठी पाऊल उचलले आहे.व्यसनमुक्त तरुणच देशाची खरी संपत्ती आहे, हे ओळखून गायकवाड परिवाराच्या वतीने ३१ डिसेंबरच्या सकाळी संगम चौकातील दारुच्या दुकाना समोर ‘दारू नको दूध प्या’ हा