जनतेज न्युज

कोल्हापूरकरांनी करवीर निवासनी श्री.अंबाबाई देवीचे दर्शन घेत केली नववर्षाला सुरूवात

प्रतिनिधी, कोल्हापूर- नववर्षाचे स्वागत करत कोल्हापूरकरांनी करवीर निवासनी श्री.अंबाबाई देवीचे दर्शन घेत या वर्षाला सुरूवात केली आहे. आज सकाळपासूनच मंदिरात गर्दी पाहायला मिळाली. गेल्या वर्षात सर्वच क्षेत्राला फटका बसला, त्यातून सावरण्याची शक्ती दे, शेतकऱ्यांना न्याय दे अशी मनोकामे भावना आज भक्तांनी केली.