प्रतिनिधी , औरंगाबाद : औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालय आणि औरंगाबाद प्राणी प्रेमी संघटनेच्या वतीने, पक्षी प्रेमींनी क्रांती चौक येथे कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर पक्षीप्रेमींची आणि पोलिसांची उपस्थिती होती. यावेळी औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त श्री निखील गुप्ता यांनीही या कार्यक्रमाला हजेही लावत उपस्थितांना संबोधीत केले.
यावेळी पक्षीप्रेमींनी सांगीतलेल्या माहिती नुसार नायलॉनच्या मांजामुळे अनेक पक्षी जखमी होतात. अनेक पक्षांचा मृत्यू होतो. त्यामुळे शहरवासीयांनी नायलॉन मांजाच्या वापर करू नये. मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवण्याचा आनंद जरूर घ्यावा परंतु साधा दोऱ्याचा वापर करावा जेणेकरून पशु पक्षांना प्राण्यांना याचा त्रास होणार नाही. ही दक्षता शहरवासीयांनी घ्यावी अशा सूचना पक्षीप्रेमी यांनी दिल्या आहे.
मकर संक्रांती निमित्त शहरात मोठ्या प्रमाणात पतंग व मांजाची विक्री करण्याकरता दुकाने सजतात आणि व्यापारी नायलॉन धाग्याचा मांजा विक्रीसाठी ठेवतात. नायलॉनच्या मांज्यामुळे शहरांमध्ये गळ्यावर चेहऱ्यावर नायलॉन मांजा घासून जखमी होण्याच्या बऱ्याच घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे पोलीस आयु्क्तांनी शहरवासीयांना पतंग उडवताना नायलॉन धाग्याचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे.
