प्रतिनिधी , हिंगोली- हिंगोली शहरातील वार्ड क्रमांक पाच असणाऱ्या कमलानगर,शाहूनगर आदी भागांमध्ये अजूनही पुरेशा सुविधा नाहीत. गेल्या अनेक वर्षापासून या भागातील नागरिक चांगले रस्ते करा, मागणी करत आहेत. पावसाळ्यात तर या भागात चालताही येत नाही, रुग्णांना दवाखान्यात जायला देखील मोठ्या अडचणी निर्माण होतात. अनेक वेळा प्रशासनाला मागणी करून देखील यावर कोणतीही कारवाई होत नाही. या भागात लवकरात लवकर नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात,यासाठी परिसरातील नागरिकांनी आज जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे. नागरी सुविधा लवकरात लवकर करण्यासाठी कार्यवाही केली नाही तर नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या संतप्त नागरिकांनी दिला आहे.
