जनतेज न्युज

सांगली… वाळवा तालुक्यातील येडेनिपानीच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 130 टन एकरी उत्पादन.. तर १५१ टन ऊस उत्पादनाचे ध्येय..

प्रतिनिधी , सांगली: शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करत असतो… जसजसे उत्पादन वाढत जाईल तसे अधिकाधिक नावीन्यपूर्ण प्रयोग करून आणखी उत्पादनात वाढ कशी करता येईल यासाठी शेतकरी झटत असतो… सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी येथील अमर पाटील हे ऊस उत्पादक शेतकरी देखील या पैकीच एक आहेत… अमर पाटील तसे ऊस शेतीत तरबेज आहेत…  आतापर्यत त्यांनी  एकरी ४० टनांपर्यंत असलेले उत्पादन १३० टनांपर्यंत पोचवण्यात यशस्वी झाले आहेत… आता एकरी १५१ टन उत्पादनाचे ध्येय ठेऊन त्यांचे व्यवस्थापन सुरू केले आहे…
येडेनिपाणी गावातील अमर तात्यासाहेब पाटील हे पट्टीचे ऊस उत्पादक शेतकरी  त्यांचे वडील व दोन चुलते यांची एकत्रित जवळपास ३८ एकर शेती आहे… जमिनीचे क्षेत्र जास्त असले तरी उत्पन्न कमी होते… काही जमिनी पडीक होत्या… अमर यांनी बारावीपर्यंत आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली… पडीक जमिनींची उत्तम मशागत करून लागवडीयोग्य बनवल्या… एकत्र कुटुंबातील तीन विहिरींची खोदाई केली… पाणीस्त्रोत वाढवले.. पाइपलाइन , संपूर्ण क्षेत्रात ठिबक ही कामे टप्याटप्प्याने पूर्ण केली… ऊसशेती सुरू झाली…
पूर्वीच्या काळात या जमिनीत एकरी ३० ते ४० टनच ऊस पिकायचा… अमर परिसरातील कै . राजारामबापू सहकारी ऊस कारखान्याच्या संपर्कात आले… त्यातून शास्त्रीय दृष्टया व्यवस्थापन करण्याचा दृष्टिकोन मिळाला… मग प्रयोगांची गोडी वाढली… मग व्यवस्थापनात बदल करीत , तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत एकरी ६० ते ६५ टन व पुढे ९ ० ते ९५ टन उत्पादनापर्यंत मजल मारली… अलीकडील काही वर्षांत एकरी १२० टन उत्पादनाचा टप्पा ओलांडण्यात ते यशस्वी झाले आहेत…अमर पाटील यांनी आता तर एकरी १५१ टन उत्पादनाचे ध्येय ठेऊन त्यांचे व्यवस्थापन सुरू केले आहे… अमर पाटील यांच्या प्रयोगशीलता आणि ऊस शेतीतील धडपड व सातत्याने केलेले प्रयत्न यांची दखल घेत अमर यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आले आहे…