जनतेज न्युज

ठाकरे सरकारने गोर – गरीबांना कोविडची लस मोफत द्यावी – खासदार नवनीत राणा

प्रतिनिधि , अमरावती – कोरोना महामारिच्या काळात सर्व सामान्य नागरिकांचे रोजगार गेले. आता कुठे परिस्थिती पुर्वपदावर येत आहे. नागरिकांना आपला रोजगार मिळविण्यासाठी सगळीकडे बाहेर फिरावे लागत आहे. लोकांपुढे प्रचंड आर्थीक संकटे आहेत, त्यामळे सर्वसामान्य लोकांना करोना ची लस विकत घेणे शक्य होणार नाही.

त्यामुळे ज्या प्रकारे पश्चिम बंगाल सरकार आणि दिल्लीच्या केजरीवाल सरकारने सर्वसामान्य लोकांसोबतच सर्वांनाच करोणा ची मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात ठाकरे सरकारने सुद्धा कोविडची लस सर्वसामान्यांसाठी मोफत उपलब्ध करून द्यावी अशी अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकार कडे केली आहे.