प्रतिनिधि , भुसावळ : मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडविण्यासाठी पतंग प्रेमींनी नायलॉनच्या मांजाचा वापर न करता साधा मांजा ला पसंती दिली असल्याचे भुसावळच्या बाजारपेठेमध्ये दिसून येत आहे नायलॉनच्या मांजामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत त्यामुळे ग्राहकही साधा मांजा खरेदी करताना बाजारपेठेमध्ये दिसत आहे पतंग विक्रीच्या दुकानांमध्ये ग्राहकांची झुंबड दिसून येत आहे ग्राहक साध्या माझ्याकडे यावर्षी आकर्षित झाल्याचे चित्र बाजारपेठेत पहावयास मिळत आहे
