जनतेज न्युज

सातारा जिल्हा महिला संघटना कोणतीही लोकशाही प्रक्रिया न करता, शेतकऱ्यांनी न मागता खालील तीन कायदे केंद्र सरकारने पारित केले.

१) शेती उत्पादने (व्यापार व वाणिज्य) कायदा २०२०
२) शेतकरी सशक्तीकरण व संरक्षण किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा २०२०
३) अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा २०२०
प्रतिनिधी , सातारा : वरील कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीचा सीमांवर जवळपास ४५ दिवसांपासून लाखो शेतकरी हाडे गोठवणाऱ्या थंडीत ठाण मांडुन बसले आहेत. सरकारला जागे करण्यासाठी व शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सज्ज व्हा.
आज जर शेतकऱ्यांना पाठिंबा दिला नाही तर हा आख्खा देश कार्पोरेटच्या हातात जाईल. आणि म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत.
शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. आजही शेती तील २/३ कामं स्त्रिया करतात. सातारा जिल्ह्यातील शेतकरी आणि स्त्रियांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सक्रिय सहभाग देण़्यासाठी आम्ही दिल्लीला निघालो आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून या महिला दिल्लीला १५ तारखेला निघणार असून दिल्ली येथे १८ जानेवारीला होणाऱ्या ‘‘ महिला किसान दिवस ’’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत शेतकरी आंदोलनात १० दिवस या महिलांचा सहभाग असेल.
महाराष्ट्रातून निघालेल्या इतर महिलांच्या जत्थ्या बरोबर सातारा जिल्ह्यातील महिला शेतकरी आंदोलनात सहभागी होत आहेत.