प्रतिनिधि , नांदेड : नांदेड जिल्ह्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या कारणावरुन आज सकाळी लोहा तालुक्यातील जानापूरी येथे दोन गटात तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीत १५ ते २० जण जखमी झाले असुन दगडफेकीच्या घटनेनंतर जानापूरीला छावणीचे स्वरुप प्राप्त झालेले पहावयास मिळाले. या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. पोलीसांच्या मध्यस्थीमुळे गावात तणाव पुर्ण शांतता असुन या दगडफेकीत जखमी झालेल्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
