जनतेज न्युज

इंधन दरवाढी विरोधात वाहनधारकांमध्ये प्रचंड नाराजी

प्रतिनिधि , परभणी : दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीच वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पेट्रोल,आणि डिझेलचे दर लवकरच शंभरी गाठतील की काय अशी शंका परभणीकरांच्या मनात निर्माण झाली आहे. देशातल्या सर्व मेट्रो शहरांपेक्षा परभणीत पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त आहेत. परभणीत आज पेट्रोल ९४.१६ रु. दराने तर डिझेल ८३.११ रु. दराने विकलं जात आहे. वारंवार पेट्रोल व डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमूळे सामान्य वाहनधारकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.