संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ठेवला रुग्णालयाच्या गेटवर
डॉक्टर वर कारवाईची मागणी
प्प्रतिनिधि , भंडारा : विष प्राशन केलेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात गेटच्या समोर मृतदेह ठेवत आन्दोलन सुरु केले आहे। चंद्रशेखर तुमस रे वय 34 वर्ष मू. गोंडसावरी त. लाखनी जि. भंडारा असे मृतकाचे नाव आहे.डॉक्टरांनी वेळीच योग्य उपचार न केल्याने सदर रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संबंधित डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली असून जोपर्यंत डॉक्टरवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला आहे।अगदी काही दिवसापूर्वी जिल्हा रुग्णालयात आग लागून त्यात दहा नवजात बालकां चा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र रुग्णालय प्रशासनाने त्यामधून काही बोध घेतला नसल्याचे आजच्या घटनेवरून परत दिसून येत असल्याच्या आरोप नातेवाईक करत आहे।
