जनतेज न्युज

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाकडून धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले

प्रतीनधी , नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुका भाजपा महिला मोर्चाच्यावतिने महाविकास आघाडीतील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुडे यांच्या विरोधात बिलोली तहसिल कार्यालया समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
१९ जानेवारी रोजी बिलोली तहसिलदार कैलासचंद्र वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हणाले धंनजय मुंडे हे राज्याचे अतिशय महत्वाचे कॕबिनेट मंत्री असून त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी बेजबाबदार व्यक्ती वर टाकलेली आहे. या घटनेचा समाजावर परिणाम होणार आहे. या घटेनेचा गाभिंर्य ओळखून वरिष्टांनी ना. मुंडेचा राजीनामा घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनावर भाजपा महिला मोर्चा चे तालूका अध्यक्ष सौ. शिवकन्या सुरकुलावार, यांच्या सह सौ. संगिता मेरगेवार, सौ.अश्विनी इंगळे, सौ. हेमा चौधरी, सौ. सुरेखा मॕकलोड, सौ. सुलोचना स्वामी, कमल जिटरावार,सौ.माधुरी फुलारी इत्यादींसह महिला कार्यकर्या उपस्थित होत्या