प्रतिनिधी , धुळे : येथील देवपूर परिसरातून देवपूर पोलिसांनी कारवाई करत गांजा 10 किलो गांजा आणि एक सिफ्ट डिजायर गाडी पोलिसांनी केलेल्या कारवाई जप्त केली असून, एकूण मुद्देमाल हा 3 लाख 16 हजार रुपयांचा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या कारवाईत 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई पोलिस करीत आहे.
देवपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या गुप्त माहिती दाराकडून मिळालेल्या माहितीनुसार 2 युवक सिफ्ट डिजायर या पांढऱ्या रंगाच्या गाडीतून गांजा हा विक्रीच्या उद्देशाने सोनगीर कडून धुळ्यात घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी आपल्या पथकासह सापळा रचून अगदी शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांनी दिली.
